मध्य रेल्वे कडून विशेष गाड्यांच्या सेवांना मुदतवाढ


प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे सेवांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक १ मार्च २०२६ पासून खालील विशेष गाड्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे.
त्यानुसार, ट्रेन क्रमांक ०११३९ नागपूर–मडगाव विशेष द्विसाप्ताहिक गाडी दर बुधवार व शनिवारी धावणार आहे. तर ट्रेन क्रमांक ०११४० मडगाव–नागपूर विशेष द्विसाप्ताहिक गाडी दर गुरुवार व रविवारी चालवली जाईल.
ट्रेन क्रमांक ०१०२७ दादर–गोरखपूर विशेष गाडी आठवड्यातून चार दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०१०२८ गोरखपूर–दादर विशेष गाडी सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी चालवण्यात येईल.
ट्रेन क्रमांक ०१०२५ दादर–बलिया विशेष त्रैसाप्ताहिक गाडी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक ०१०२६ बलिया–दादर विशेष त्रैसाप्ताहिक गाडी बुधवार, शुक्रवार आणि रविवारी चालवण्यात येईल.
वरील सर्व विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.