भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातील 660 मेगावॅट क्षमतेच्या संचामध्ये आज तापमान वाढल्याने बॉयलरमधील एका ट्यूबचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रकल्प परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संच कार्यरत असताना तापमानात अचानक वाढ झाली आणि त्यातून बॉयलर ट्यूब फुटली. स्फोटानंतर तत्काळ आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली. घटनास्थळी लागलेली आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचे पथक नियुक्त करण्यात आले असून सखोल चौकशी सुरू आहे. तांत्रिक बिघाड, तापमान नियंत्रण यंत्रणेमधील त्रुटी किंवा इतर कारणांचा तपास केला जात आहे.
दरम्यान, दरम्यान, बॉयलर ट्यूबचा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रकल्पाचे तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून तात्काळ तपासणी सुरू आहे. अधिकृत कारण समोर आल्यानंतरच सविस्तर माहिती स्पष्ट होणार आहे.



