. भुसावळ (प्रतिनिधी )-
अखिल भारत वर्षीय माहेश्वरी महिला संगठन व गीता परिवाराच्या संयुक्त विद्यमानाने १५ दिवसीय ई संस्कार वाटिका प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी ३४ हजार मुले,मुली,तरुण,तरुणींची नोंदणी झाली होती.या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे. हुआ है वर्ल्ड में दक्षिणांचल अर्थात महाराष्ट्र, कर्नाटक,तमिलनाडु व आंध्रप्रदेश राज्याचा सहभाग असलेल्या उपक्रमाची जबाबदारी राष्ट्रीय प्रभारी निर्मला मारू,दक्षिणांचल उपाध्यक्ष कलावती जाजू, दक्षिणांचल महामंत्रानी पुष्पा तोष्णीवाल,महाराष्ट्र प्रदेश संयोजिका संगीता मनियार यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणी गृपच्या सचिव व बाल विकास एवं किशोरी विकास समिति चा राष्ट्रीय सहप्रभारी संगिता बियाणी, यांच्याकडे होती. ई-संस्कार वाटिका प्रश्नमंजुषा स्पर्धेत पुरस्कार घोषित झालेल्या स्पर्धकांना गीता परिवार मुख्यालय तर्फे लाॅकडाऊन हटल्याच्या १५ दिवसानंतर बक्षिस पाठविण्यात येणार आहे.तरी विजेत्या स्पर्धकांनी
संबंधितांशी संपर्क साधून आपला क्रमांक द्यावा असे आवाहन
गीता परिवार,अ.भा. माहेश्वरी महासभा, बालक एवम् किशोरी विकास समिति अ.भा. माहेश्वरी महिला संगठन,
अ.भा. माहेश्वरी युवा संगठनेने केली आहे.गिनीज बुक मध्ये नोंद झाल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.



