भुसावळ (प्रतिनिधी ) येथील नाहाटा महाविद्यालयात विमानअपघातात दुःखद निधन झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम करण्यात आला याप्रसंगी सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यानंतर उपप्राचार्य प्रा.डॉ.दीपक पाटील उपप्राचार्य प्रा.डॉ.जी आर वाणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय एम पाटील पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील कार्यालयीन अधीक्षक भगवान तायडे,सचिन पाटील यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तदनंतर शांतीमंत्र म्हणण्यात आला आणि दोन मिनिट स्तब्ध राहून त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान हो यासाठी प्रार्थना करण्यात आली

यावेळी उपस्थित त्यांना अजितदादा यांच्या कार्याची थोडक्यात ओळख महाविद्यालयाचे प्रा.भूषण बाणाईत यांनी करून दिली. याप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले


