भुसावळ सीआरएमएसतर्फे पीओएचमध्‍ये निदर्शने

भुसावळ (प्रतिनिधी )- सीआरएमएसचे मंडळ अध्यक्ष व्‍ही.के.समाधीया, झोनल वर्कशॉप सचिव पी.एन. नारखेडे, मंडळ सचिव एस.बी. पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने श्रम कायद्‍यात केलले बदल व डीए थांबविण्‍याच्‍या निषेधार्थ सेंट्रल रेल्वे मजदूर संघ पीओएच शाखेतर्फे आज २२ मे रोजी काळ्‍या फिती लावून निषेध करण्‍यात आला.
सदर आंदोलन अध्यक्ष किशोर कोलते, सचिव डी.यू.इंगळे यांच्‍या नेतृत्वाखाली करण्‍यात आले.यात दीपक खराटे,ईश्वर बाविस्कर, विकास सोनवणे,मेघराज तल्लारे, हरिचंद सरोदे ,स्वप्निल पाटिल, प्रमोद बविस्कर,राजेश सोनी, सुरेन्द्र गांधिले,कुणाल बोंडे,फारुख शेख,भूषण पाटिल,रूबाब तडवी यांच्‍यासह पदाधिकारी,कमेटी मेंबर व कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *