सफाई कामगारांना अत्‍यावश्‍यक वस्‍तू वाटप ;

   

भुसावळ (प्रतिनिधी )-येथे वाणिज्य विभागातील तिकीट तपासणी कर्मचा-यांतर्फे स्थानकावर कार्यरत सफाई कामगारांना आज दि.२२ मे शुक्रवार रोजी किराणा सामान व अत्‍यावश्‍यक वस्‍तू वाटप करण्यात आले. भुसावळ रेल्‍वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्‍यवस्‍थापक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार वाणिज्य विभागातर्फे भुसावळ रेल्वे स्थानकावर भुसावळ स्टेशन तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांतर्फे सफाई कामगारांना जीवनावश्यक वस्तू ,किराणा सामान वाटप करण्यात आले.एकुण ५० गरजू सफाई कामगारांना हे वाटप करण्यात आले .
लॉक डाऊन दरम्यान मध्य रेल्वेच्या इतर विभागांप्रमाणेच, भुसावळ वाणिज्य विभागही गरजूंना आवश्यक मदत पुरविण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *