भुसावळच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. छाया पाटील यांचा सत्कार

भुसावळ (प्रतिनिधी):
जळगाव जिल्ह्यातील यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. छाया अतुल पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून लक्षणीय विजय मिळवला. या यशाबद्दल भुसावळ तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

भुसावळ येथील शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, जिल्हा सह-समन्वयक प्रा. उत्तम सुरवाडे, रेल्वे कामगार सेनेचे ललित मुथा, शहरप्रमुख मकबूल मेंबर, शहरप्रमुख गणेश सोनवणे, कट्टर शिवसैनिक नमा शर्मा आदी पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा सौ. छाया पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना भेटवस्तू देत सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अतुल पाटील यांनी शिवसेनेच्या संघटन वाढीसाठी भविष्यात राबवायच्या रणनीतीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावल नगरपरिषदेतील विकासकामांना गती देत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या सत्कारामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.