भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात (IQAC ) आयक्यूएसी
व संगणकशास्र विभागाच्या वतीने शिक्षकांसाठी लर्निंग मॅनेजमेंट (Learning Management )च्या अंतर्गत दोन दिवशीय ऑनलाइन नॅशनल लेव्हल वर्कशॉप( Two day Online National Level Workshop On “LMS E-Content Development”) दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे दि. १६ व १७ मे २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उदघाटन डॉ. मोहन फालक (अध्यक्ष, ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ) व प्राचार्य डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य व आयक्यूएसी ( IQAC ) समन्वयक व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी उद्घाटन केले. हि कार्यशाळा एकूण चार सत्रात संपन्न झाली.
या दोन दिवशीय कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे उपप्राचार्य यांनीएल एम एस (LMS) या विषयावर मॉडल ( Moodle) या software ची माहिती दिली. दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. डॉ. गौरी एम. पाटील यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन
(power point presentation) तयार करण्याविषयी माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात प्रा. प्रियांका बऱ्हाटे संगणकशास्र विभागप्रमुख डीएनसीव्हीपी शिरीष मधुकरराव चौधरीं कॉलेज जळगाव
(DNCVP’s Shirish Madhukarrao Chaudhari College, Jalgaon) यांनी गुगल फ्रॉम अँड गुगल क्लास रूम (Google Form and Google Class Room )या एलएमएस (LMS )विषयी उपयुक्त मार्गदर्शन केले. व चौथे सत्रात प्रा. डॉ. जी. आर. वाणी. यांनी व्हिडीओ कनेक्ट डेव्हलपमेंट (Video Content Development )या विषयावर माहिती दिली.
या कार्यशाळेत सुमारे ३५० शिक्षकांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला होता. हि कार्यशाळा Technical Knowledge करिता उपयुक्त अशी ठरली असे सहभागी प्राध्यापकांनी सांगितले. सर्व सहभागी प्राध्यापकांना ई सर्टिफिकेट (e-certificate )
देण्यात आले.
या कार्यशाळेसाठी संयोजक म्हणून प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे व कार्यशाळेचे सचिव म्हणून प्रा. हर्षल वि. पाटील यांनी काम बघितले. तसेच संगणकशास्र विभागाततील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वीरीत्या पार पाडली.



