भुसावळातील शिवाजी नगरातून अज्ञात चोरटयांकडून मोटारसायकल लंपास


भुसावळ – शहरातील शिवाजी नगर येथील पोस्ट ऑफिस जवळील हिरो मोटारसायकल अज्ञात चोरटयाने लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउन दरम्यानचा फायदा घेवून चोरटयाने दुचाकी लांबविली मात्र अद्यापपावेतो दुचाकी चोरटयाचा पत्ता लागलेला नाही.
शहरातील शिवाजी नगर भागातील पोस्ट ऑफिस जवळील रहिवासी राजेश रमेश शिंदे यांची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल क्रमांक एम एच १९, सिटी ६१९४, काळया व निळया रंगाची मोटारसायकल अज्ञात चोरटयाने लॉकडाउनचा फायदा घेवून दि.2 रोजीरात्री 2 ते 5 च्या सुमारास घराजवळून चोरुन नेली. याबाबत ऑनलाइन तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर राजेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार चौधरी हे करीत आहे.
मोटरसायकल चोरीप्रकरणी सुरुवातीला तक्रार घेण्यात आली नाही ऑनलाइन तक्रार करा असे सांगण्यात आले त्यानंतर चोरीची तक्रार देण्यात आली मात्र अद्यापपावेतो घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला नाही व तपास ही होत नाही असे सांगण्यात आले आहे या मोटार सायकल चोरी प्रकरणी पोलीसांनी
तेथील सीसीटीव्ही तपासून
तपास करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *