तैलीक समाज वधू–वर पालक परिचय मेळाव्याचे कलश व मंडप भूमिपूजन : दादासाहेब शांताराम नारायण चौधरी यांच्या हस्ते संपन्न-

भुसावळ (प्रतिनिधी ) – तैलीक समाजाच्या राज्यस्तरीय वधू–वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन येत्या 14 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले असून या मेळाव्याच्या तयारीचा शुभारंभ म्हणून कलश व मंडपाचे भूमिपूजन सोहळा आज 7 डिसेंबर 2025 रोजी दादासाहेब शांताराम नारायण चौधरी नगर, खानदेश सेंट्रल मॉल, जळगाव येथे उत्साहात पार पडला.

लोककल्याणासाठी समर्पित, जळगावचे प्रसिद्ध उद्योजक व समाजकारणी तसेच भाजपा युवा कार्यकर्ते विनोददादा शांताराम चौधरी यांच्या वडिलांच्या हस्ते हा शुभारंभ झाला. समाजसेवा, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याने समाजबांधवांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

या कार्यक्रमास दत्तात्रय तुकाराम चौधरी (अध्यक्ष युवक मंडळ), अनिल रामदास पाटील (सचिव), विनोददादा शांताराम चौधरी, सिताराम देवरे, बी. एम. चौधरी, डॉ. अर्जुन चौधरी, अनिल नथ्यू चौधरी, संजय श्रीराम चौधरी, व्ही. आर. पाटील, अशोक लोटन चौधरी, सुभाष चंदू चौधरी, नामदेव नारायण चौधरी, मधुकर किसन देवरे, भुसावळ शहर तेली समाज उपाध्यक्ष सुरेश सोनू चौधरी, ऑडिटर सुनील चौधरी सर, मेघशाम गुलाब चौधरी, राहूल दत्तात्रय चौधरी, दिपक धनराज चौधरी, भानुदास चौधरी, जे. बी. चौधरी, दिलीप बाबूराव चौधरी, मांगो श्रावण चौधरी, निलेश शांताराम चौधरी, सुरेश हिरामण चौधरी, प्रशांत अमृत चौधरी, मयूर अरुण ठाकरे, विनोद सुधाकर चौधरी, अर्जुन चौधरी, योगराज चौधरी, कैलास चौधरी, भगवान चौधरी, जितेंद्र संतोष चौधरी, किरण चौधरी, लोकेश चौधरी, भिकन चौधरी आदी मान्यवरांसह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राज्यभरातील तैलीक समाज बांधवांना एकत्र आणणाऱ्या या मेळाव्यामुळे अनेक कुटुंबांना योग्य अश्या वधू–वरांच्या भेटीची संधी मिळणार आहे. भूमिपूजनानंतर मेळाव्याच्या नियोजनाबाबत चर्चा होत असून सर्व समित्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत.

— तैलीक समाज, जळगाव