भुसावळ (प्रतिनिधी ) – ६ डिसेंबर, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलतर्फे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आले असून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी रक्त तपासणी तसेच त्वचा आणि केसांच्या समस्यांसंदर्भातील तपासणी करण्यात येणार आहे. अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या सहकार्यामुळे आयोजित “पोलिसांचे कार्य अत्यंत तणावपूर्ण आणि वेळेच्या मर्यादेत असते. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारची शिबिरे पोलिस दलासाठी खूप उपयुक्त ठरतात. अशा उपक्रमांमुळे पोलिस दल अधिक सक्षम आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या सहकार्यामुळे आयोजित या शिबिराचा पोलिस दलातील सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन. बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व आर्या फाऊंडेशनच्या संचालिका डॉ वंदना वाघचौरे यांनी केले आहे .


