यावल तालुक्यातील खून प्रकरण : चार आरोपींना अटक –


यावल वार्ताहर : सोशल मिडीयावर रिल्स तयार करून त्यावर शिवीगाळ केल्याच्या कारणावरून यावल-बोरावल रस्त्यावरील पाटचारीजवळ जळगावातील समता नगरातील रहिवासी तुषार चंद्रकांत तायडे (19) वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणी संशयित आरोपी अविनाश सोनवणे (सुजदे, ता.जळगाव), निलेश कोळी (रा.बोरनार, ता.जळगाव), कल्पेश इंगळे (आसोदा), विजय सोनवणे (सुजदे) यांना अटक करण्यात आली. गुरुवारी संशयीला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायाधीश आर. एस. जगताप यांनी 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सोशल मिडीयात रील्स टाकण्याचा वाद जीवावर
मयत तुषार चंद्रकांत तायडे (समतानगर, जळगाव) याने काही दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर रिल तयार करून त्यात शिवीगाळ केली होती व त्यातून तुषार तायडे यास 2 डिसेंबरच्या सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान यावल-शेळगांव रस्त्यावरील बोरावल गावाजवळील पाटचारीजवळ अडवत राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे व सहकार्‍यांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याने मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

यांच्याविरोधात गुन्हा
याप्रकरणी तुषारचे वडील चंद्रकांत तायडे यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयित आरोपी अविनाश सोनवणे (सुजदे, ता.जळगाव), निलेश कोळी (बोरनार, ता.जळगाव), कल्पेश इंगळे (आसोदा), विजय सोनवणे (सुजदे) यांना पोलिसांनी अटक केली. संशयीतांना गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश आर. एस. जगताप यांनी यांनी 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.