भुसावळ सब्जी मंडी गृप आणि आडत असोसिएशनतर्फे मदत निधी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
जगासह राज्यात कोरोना संकटाचा कहर झाला आहे. संपुर्ण जग या व्याधीने अडचणीत आले आहे. या संकटाला नष्ट करण्यासाठी सरकार सर्वोतपरी उपाययोजना करत आहे. या संकट समयी राज्यसरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक सहाय्य करण्यासाठी आवाहन केले होते.
या आवाहनाला भुसावळ येथील सब्जी मंडी गृप आणि आडत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत व आपले कर्तव्य म्हणून २५ हजारांचा धनाकर्ष प्रातांधिकारी रामसिंग सुलाने यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी,सचिव निलेश माळी ,उपाध्यक्ष उमेश चौधरी तर व्यापारीवर्गाचे दीपक काटकर,अनिल चौधरी,गोलु चौधरी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *