भुसावकात ३ वाजेपर्यंत २७.९९ टक्के मतदान : मतदारांमध्ये उदासीनता

भुसावळ (प्रतिनिधी ) – दि. 2 डिसेंबर 2025 — भुसावळ नगर परिषद निवडणूक 2025 साठी आज झालेल्या मतदानाला एकूण मतदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट झाले आहे. आलटून-पालटून वाढणारी मतदानाची संख्या असली तरी टक्केवारी मात्र समाधानकारक नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

निवडणुकीच्या सुरुवातीपासून दर दोन तासांनी जाहीर झालेली अधिकृत मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणेः

सकाळी 7.30 ते 9.30

स्त्री मतदार : 3,913

पुरुष मतदार : 5,249

तृतीयपंथी मतदार : 0

एकूण मतदान : 9,162 (5.12%)

सकाळी 7.30 ते 11.30

स्त्री मतदार : 16,043

पुरुष मतदार : 13,576

तृतीयपंथी मतदार : 1

एकूण मतदान : 29,620 (16.57%)

सकाळी 7.30 ते 1.30

स्त्री मतदार : 23,982

पुरुष मतदार : 26,060

तृतीयपंथी मतदार : 5

एकूण मतदान : 50,047 (27.99%)

दुपारी 1.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी केवळ 27.99% इतकी नोंदली गेली असून, मतदारांची उदासीनता स्पष्टपणे जाणवत आहे. सकाळच्या तुलनेत मतदानाचा वेग वाढला असला तरी अपेक्षित प्रमाणात नागरिक मतदान केंद्रांकडे न वळल्याने निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पुढील तासांत मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. मतदान सायंकाळीपर्यंत सुरू राहणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.