भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील कंटेन्मेंट झोनमधून बाहेर येऊन दुकाने उघडणार्या विक्रेत्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली असून सोमवारी पालिकेच्या विशेष पथकाने पाच जणांवर कारवाई करुन तब्बल ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला
. शहरात शांतीनगर, समतानगर, सिंधी कॉलनी, पंचशिलनगर व महेशनगर अशा पाच ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने, कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहे मात्र या कंटेनमेंट झोनमधून काही जण बाहेर निघत आहेत.
या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. कंटेन्मेंट झोनमधून बाहेर निघणार्या नागरीकांमुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने कारवाई तीव्र केली आहे . कंन्टेन्मेंट झोनमधील दुकानदारांनी झोनच्या बाहेर निघू नये, दुकाने सुरु करण्याची शिथिलता असली तरी दुकानदारांनी घरातच थांबावे
कंटेन्मेंट झोनच्या बाहेर निघून दुकाने सुरू करु नये ,नियमांचे उल्लंघण करणार्यांवर कारवाई होणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.पालिकेने कंटेन्मेंट झोनच्या आतील नागरिकांना घरपोच किराणा, औषधे, दूध, फळे आदी मिळण्याची सुविधा दिली आहे. यासाठीची माहितीही जाहीर केली होती मात्र कंटेन्मेंट झोनमध्ये घरपोच सुविधा असतानाही बरेच नागरीक या सुविधेचा फायदा न घेता, खरेदीसाठी घराबाहेर निघत आहेत. विशेष म्हणजे लहान मुले, वयोवृद्धांचा यात समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.



