पंतप्रधान आवास योजनेतंर्गत अर्धवट असलेली घरकुलांचे बांधकाम सुरू करावे – जिल्हाधिकाऱ्यांकडे दिपक धांडे यांची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी)-
पंतप्रधान आवास योजनेतंर्गत भुसावळ शहरातील ४८ लाभार्थ्यांना भुसावळ नगर पालिका मुख्याधिकारी यांनी गेल्या ६ महिन्यापूर्वी बांधकाम परवानगी पत्र दिले आहे व त्या अनुषगाने सर्व लाभार्थ्यांनी आपापले जुने पडके घरे पाडून आपल्या जागेवर नवीन घरांचे काम सुरू केले होते १ मार्च पर्यंत सर्व लाभार्थ्यांनी ओटा लेव्हल पर्यंतचे काम पूर्ण केले व त्या केलेल्या कामाच्या मोबदल्यात नगर पालिकेतर्फे लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयाचा पहिला हप्ता सुध्दा मिळाला परंतु त्यानंतर कोरोना व्हायरस ने संपूर्ण देशाला वेठीस धरले व देि २२ मार्च पासून संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला त्यामुळे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाची कामे सुध्दा बंद करण्यात आली आहे.या सर्व लाभार्थ्यांनी गेल्या ६ महिन्यापासून भाड्याची घरे घेतलेली आहे त्यामुळे त्यांना घरभाडे सुध्दा भरणे अवघड झालेले आहे म्हणून जून महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे कामे पूर्ण व्हावी यासाठी घरकुलांचे कामाला लवकरात लवकर परवानगी द्यावी व पंतप्रधानआवास योजनेतील लाभार्थी ना न्याय द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी जिल्हाधिकारी यांना
केली असून या बाबत निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *