भुसावळ नगरपालिका निवडणूक : माझी उमेदवारी – प्रभाग २३ (ब) चा सर्वांगीण विकास करणार – ऍड भंडारी जास्वंदी निलेश

भुसावळ (प्रतिनिधी ) : नगरपालिकेच्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ (ब) मधून सर्वसाधारण गटात भंडारी जास्वंदी निलेश यांनी उमेदवारी दाखल केली आहे. स्थानिक जय मातृभूमी पक्षाच्या सहकार्याने त्या निवडणूक लढवत आहेत. अनेक सेवाभावी क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसूनही प्रभागातील मूलभूत समस्या सोडविण्याच्या उद्देशाने त्यांनी निवडणुकीत उतरल्याचे त्यांनी सांगितले. या प्रभागातील समस्या विळखा घालून बसल्या आहेत आज पर्यंत सत्ताधारी असलेल्या नी कोणतेही विधायक कामे या भागात केले नाही नागरिकांच्या मुलभूत गरजा त्याही वेळवर व विनाविलंब मिळाव्या हीच अपेक्षा पूर्ण करणार त्यासाठी या निवडणुकीच्या रणभूमीत उतरून कार्य करणार अशी ग्वाही ऍड जास्वंदी भडारी यांनी दिली

गेल्या ९–१० वर्षांपासून भुसावळ शहरात अवेळी पाणीपुरवठा, रस्त्यांच्या दुतर्फा वाढणारे कचऱ्याचे ढिग, अस्वच्छतेमुळे उद्भवणारे साथीचे आजार, धुरळणी-फवारणीचा अभाव, खराब रस्ते, नगरपालिका शाळांची दुरावस्था, तसेच तुंबलेल्या गटारी-नाल्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे जास्वंदी भंडारी यांनी नमूद केले.

या सर्व समस्या प्रभाग २३ मध्येही तीव्र असून, लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. वकील व नोटरी म्हणून उच्चशिक्षित असलेल्या जास्वंदी भंडारी यांनी प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी ठोस काम करण्याचा आपला निर्धार विकासाचा व संकल्प विजयाचा अशी भूमिका घेत संकल्प व्यक्त केला आहे .

यासोबतच त्यांनी महिला आणि बाल सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास आणि स्वावलंबनाच्या संधी वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केवळ पक्षांचे चिन्हं बघुन मतदान न करता काम करणाऱ्या योग्य उमेदवाराला निवडुण द्यावे असे आवाहन केले असून ईव्हीएमवरील आपल्या चिन्हासमोरील बटण दाबून नागरिकांनी आपला कर्तव्यनिष्ठ प्रतिनिधी निवडावा, अशी विनंती जास्वंदी भंडारी यांनी केली.