भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळात मद्य विक्री करण्यास परवानगी देवू नये या आशयाचे निवेदन येथील काही दारू विक्रेत्यानी आज मंगळवार ५ में रोजी प्रशासनाला दिले .
शहरात किरकोळ मद्य विक्रेत्यांना आयुक्त व जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशानुसार भुसावळ शहरात काही परवाना धारकांना राज्य सरकारने ठरलेल्या नियम व अटी व शर्तीमध्ये विक्रीसाठी परवानगी दिली असून काही परवानाधारक शासनाने सील केलेल्या परिसरातील मद्य विक्रेता परवानाधारक तसेच नगर परिषद संकुल मध्ये येत असल्याने बंद राहणार आहे.
त्यासाठी सर्व एफ.एल.3 बंद ठेवण्यात आले आहे.
कोरोना व्हायरस प्रादुर्भाव व परिस्थती लक्षात घेता परवानगी मिळालेले सर्व परवानाधारक जे आपल्या आदेशानुसार मद्यविक्री दुकान सुरू करणार आहेत मात्र आम्ही मद्य विक्री न करण्यास आपली परवानगी घेऊ इच्छितो. शहरातील स्थिती दययनीय आहे. नागरिक हे मद्य प्राशन करण्यासाठी आतुर व व्याकुळ झाले आहे.या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नाही . कारण होणाऱ्या गर्दी मुळे गुन्हे घडण्याची दाट शक्यता आहे.या गर्दीमुळे सोशल डिस्टनसिंग नियमाचे पालन होणार नाही याचे चित्र काल काही जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या परवानाधारकांच्या दुकानात प्रसारमाध्यमांतुन दिसून आले आहे. भुसावळ मध्ये ही स्थिती निर्माण झाली तर असंख्य मद्यपींनी आताच मोबाईलव्दारे कहर केला आहे. म्हणून कोरोना व लॉककडाउनच्या पार्श्वभुमीवर लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन होणार नाही.यासाठी किरकोळ मद्य विक्रेते मधुर वाईन,पंकज अँड सन्स, एन.पी.रणधीर,स्टार वाईन, प्रमोद. एम. भंगाळे,नितीन बसंतांनी, अशोक वाईन्स, वाईन सेंटर, ऍडी.आर. कवींना,नरिमन अँन्ड कंपनी यांनी दिनांक 5 मे रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक कल्याण मुळे यांना निवेदन दिले.



