भुसावळ (प्रतिनिधी ) –
आज दि 20/11/2025 रोजी भुसावळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने प्रशासनाकडून कर्मचारी करिता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले . आजच्या या प्रशिक्षणामध्ये एकूण 842 पैकी 801 कर्मचारी उपस्थित होते व 41 कर्मचारी गैरहजर होते गैरहजर कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे .

. प्रथम प्रशिक्षण वर्ग सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत जिमखाना हॉल पी. ओ. नाहटा महाविद्यालय जामनेर रोड भुसावळ येथे तसेच E.V.M. हाताळणी प्रशिक्षण दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ताप्ति पब्लिक स्कूल भुसावळ येथे होते . आणि द्वितीय सत्र दुपारी 12.30 ते 2 वाजेपर्यंत जिमखाना हॉल पी. ओ. नाहटा महाविद्यालय जामनेर रोड भुसावळ पार पडले तसेच E.V.M. हाताळणी प्रशिक्षण दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत ताप्ति पब्लिक स्कूल भुसावळ येथ संपन्न झाले . यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, सहायक निवडणूक अधिकारी राजेंद्र फातले आणि नायब तहसीलदार संतोष विनंते उपस्थित होते .


