प्रभाग 10 मध्ये अत्याधुनिक यंत्राद्वारे निर्जन्तुकिकरण

शहरातील प्रभाग १० मधील नगरसेविका सौ मेघा वाणी व नगरसेवक प्रा दिनेश राठी तसेच विठ्ठल मंदिर वार्ड मित्र मंडळ यांच्यावतीने सोमवार रोजी प्रभाग १० मध्ये विठठ्ल मंदिर वार्ड ,राम मंदिर वार्ड, गांधी चौक, भजे गल्ली परिसर या ठिकाणी अत्याधुनिक यंत्राद्वारे कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी करून परिसर संपुर्ण निर्जनतुक करण्यात आला. फवारणी संपूर्ण प्रभागात करण्यात येत आहे .
तसेच या प्रसंगी नागरिकांना विनाकारण घरा बाहेरच न जाण्याचे, सोशल अंतर ,मास्क चा वापर करा यासह घरात रहा , सुरक्षित रहा असे आवाहन करण्यात आले.यावेळी देवा वाणी यांच्यासह विठ्ठल मंदिर वार्ड मित्र मंडळ यांनी सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *