मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार (56) यांचे मंगळवारी सकाळी झोपेत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. झोपेतच हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रेल्वे विभागात शोककळा पसरली आहे

महिनाभरापूर्वीच स्वीकारला पदभार
विजयकुमार हे इंडियन रेल्वे मेकॅनिकल इंजिनिअरिंग 1988 बॅचचे अधिकारी होते. 1 ऑक्टोंबर 2025 रोजी त्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक (जीएमम) पदाचा पदभार स्वीकारला होता.
चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सच्या महाव्यवस्थापक पदाची ही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. या काळात त्यांनी लोकोमेटिव्ह उत्पादनात विक्रम प्रस्थापित केला होता. उत्तर रेल्वे, उत्तर पश्चिम रेल्वे, रेल्वे बोर्ड, रेल्वे विभागातील आरडीएसओ तसेच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन मध्येही त्यांनी यशस्वी कामगिरी केली होती


