भुसावळातून रोकड व मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशांतून अटक –


भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील मानकबाग भागातील रहिवासी श्रीकांत मल्हारी कुलकर्णी यांच्या घरातून दहा हजार रुपये रोख व आठ हजार रुपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटाने घरात प्रवेश करून चोरून नेल्यांची घटना ता,१२ रोजी रात्री दोन ते पाच वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन संशयिताना मध्यप्रदेशातून अटक केली.

सदर गुन्ह्यातील चोरीस गेला मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून चोरीस गेलेला मुद्देमाल संशयित आरोपी अनिल जगदीश सेनानी राहणार तालुका सेंधवा जिल्हा बडवानी,अतुल जादू सोलंकी राहणार जामठी तालुका वरला जिल्हा बडवाणी राज्य मध्य प्रदेश यांच्याकडून हस्तगत करण्यात आला असून सदर दोघ संशयितांना गुन्ह्याचे तपास कामी अटक करण्यात आली.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित,पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे, ग्रेपोउपनिरीक्षक जाकिर अली सैय्यद,पोलीस कर्मचारी राहुल भोई,विकार शेख अशांनी केली.