भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवसेना (शिंदे गट) यांचा भुसावळ तालुका मेळाव्याचे आज दि. २ नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता, संतोषी माता हॉल या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला शिवसेनेचे नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती वक्ते म्हणून राहणार आहे. या मेळाव्याला तालुक्यातील शिवसेनेचे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी, शिवसेनेवर प्रेम करणारे तमाम शिवसैनिक, नागरिक यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जेष्ठ शिवसैनिक विलास मुळे, महिला जिल्हाप्रमुख नंदा निकम, भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष माळी, महिला तालुकाप्रमुख वर्षा तल्लारे, युवा सेना जिल्हाप्रमुख पवन भोळे, भुसावळ शहरप्रमुख पवन नाले, महिला शहरप्रमुख दीपाली बराटे, वरणगाव शहर प्रमुख दुर्गेश बेदरकर, महिला शहरप्रमुख श्रद्धा गायकवाड, माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक यांनी केले आहे.


