जळगाव ( प्रतिनिधी ) –पुनीत बालन प्रस्तुत ५२ वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धा 2025 2026 व राष्ट्रीय निवड चाचणी
स्पर्धा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव
येथे महाराष्ट्र ज्यूदो
असोसिएशन आयोजित जळगाव जिल्हा हौशी ज्यूदो असोसिएशन तर्फे दिनांक 1 नोव्हेंबर
आणि 2 नोव्हेंबर 2०25 रोजी ‘आयोजित करण्यात आली आहे, आज स्पर्धेचा 1ला दिवस होता. स्पर्धा चांगल्याच रंगल्या. सर्व हौशी ज्यूदो संघटनाचे अध्यक्ष विष्णू
भाऊ भंगाळे आणि महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनतर्फे या स्पर्धा सुरू झाल्या आहेत.. या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 30 जिल्हे सहभागी
झाले असून एकूण 350 मुला मुलींनी सहभाग घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या या
स्पर्धेमुळे जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना ज्यूदो खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. ज्यूदोचा
प्रसार देखील जोरदार होण्यास मदत होत आहे.
अध्यक्ष आणि माजी महापौर विष्णूभाऊ भंगाळे व सचिव उमेश पाटील आणि सर्व पदाधिकारी व कार्यकारी अधिकारी यांच्या
मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचे वातावरण ज्यूदोमय झालेले दिसून येत आहे.


या स्पर्धा महाराष्ट्र ज्यूदो संघटना अध्यक्ष शैलेश टिळक व सचिव दत्ता आफळे यांच्या
मार्गदर्शनाखाली होत आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे शैलेश टिळक ,जैन इरिगेशन चे रवींद्र धर्माधिकारी, महाराष्ट्र राज्य ज्यूदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेटकर , पारोळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण , गणेश शेटकर ग .स चे संचालक अनिल देशमुख , महेश पाटील आंतरराष्ट्रीय पंच विजय यादव, टुर्नमेंट डायरेक्टर अमोल देसाई , राज्य सॉफ्ट बॉल संघटनेचे सचिव व शिव छत्रपती अवार्ड विजेते प्रदीप तळवेलकर,टेक्निकल मेम्बर अतुल बामनोदकर, सचिन देवळे,वृषाली लेग्रस
महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन चे उपाध्यक्ष ऍड. विकास पाटील, तांत्रिक समिती अध्यक्ष दर्शना लखानी आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी
सचिव डॉ उमेश पाटील,योगेश महाजन, अतुल गोरडे, अजय काशीद, डिंगबर महाजन, सचीन वाघ, डॉ चांद खान, अशफाक शेख,पदाधिकारी जळगाव जिल्हा ज्यूदो हौशी संघटना हे परिश्रम घेत आहेत… दरम्यान , उद्या या स्पर्धेचा समारोप होणार असून या प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील ,राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार , सुप्रसिद्ध वकील उज्ज्वलजी निकम , खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती पाटील व महेश पाटील यांनी केले,असे सचिव प्रा. डाॅ उमेश पाटील व तुषार वाघुळदे यांनी कळविले आहे.



