वरणगाव (प्रतिनिधी ) –
येथील पालिकेतील बांधकाम अभियंता 20 मार्च पासून कोणतीही परवानगी न घेता गैरहजर आहेत यामुळे शहरातील विविध विकास कामांना खोळंबा बसला असून बांधकाम विभागाचा अतिरिक्त पदभार देखील सोपविला जात नसल्याने वरणगाव पालिकेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष उद्या 30 रोजी पालिकेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेतील बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे अनेक वेळा या ठिकाणी कामावरून खटके उडाले आहे बांधकाम अभियंता अभय गुटाळ हे 20 मार्च पासून विनापरवानगी पालिकेत गैरहजर आहे शहरात व राज्यात लॉक डाऊन आहे पालिकेचे बगीच्या पाणीपुरवठा योजना विविध सभागृह नागेश्वर महादेव मंदिर अशी पाच कोटी रुपयाची विकास काम कार्यारंभ देण्याचे आदेश देण्याचे बाकी असून शहराच्या विकास कामात खोळंबा घातला आहे सदर बांधकाम अभियंता चा अतिरिक्त पदभार सोपवणे साठी वेळोवेळी सांगितले तरी पदभार सोपवला गेला नसल्याने 30 एप्रिल रोजी नगराध्यक्ष सुनील काळे व उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ पालिकेसमोर उपोषणाला बसणार आहे. बांधकाम अभियंता यांना दिले दोन वेळेस कारणे दाखवा नोटीस वरणगाव पालिकेतील बांधकाम अभियंता अभय गुटाळ हे 20 मार्चपासून कोणतीही परवानगी न घेता गैरहजर आहेत यामुळे मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी यांनी दोन वेळेस कारणे दाखवा नोटीस दिली आहे परंतु अद्यापही ते हजर झाले नाहीत तसेच कोरणा सारख्या साथीच्या आजारात ते गैरहजर असल्याने त्यांच्या या कार्यावर ती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावर ती कार्यवाही करावी अशा प्रकारची मागणी होत आहे



