वरणगाव (प्रतिनिधी)-
वरणगांव नगर पालिका येथे रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्यावतीने वरणगाव नगरपालिका पोलिस व आरोग्य कर्मचारी यांना पीपीई किट्स (ppe kits), मास्क व सॅनीटायझर देण्यात आले याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक सुधाकर जावळे ,माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे ,वैशाली देशमुख, जागृती बढे , राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवि सोनवणे ,तसेच भाजपा शहर अध्यक्ष महेश सोनवणे ,कौस्तुभ पाटील, वैभव महाजन, सर्व कर्मचारी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातर्फे हा सामूहिक कार्यक्रम संपन्न झाला.



