कुशल अकुशल मजुरांना मनरेगा व इतर योजनेतून काम उपलब्ध करून द्यावे – मंगेश पाटील ; पालक मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे केली ऑनलाइन निवेदनाद्वारे मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गेल्या महिन्यापासुन लॉक डाऊन सुरु आहे त्यामुळे आगामी काळात मोठी आर्थिक अडचण होणार असून उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुंबई ,पुणे व राज्यातील इतर भागातून गावी आलेल्या कुशल ,अकुशल विद्यार्थी व मजुरांना मनरेगा व इतर योजनेतून काम उपलब्ध करुन द्यावे जेणें करून आर्थिक मंदीचे काळात सर्वाच्या हाताला काम मिळून त्याचा फायदा होईल अशी मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष जळगाव मंगेश पाटील यांनी
ऑनलाइन निवेदनाद्वारे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे केली आहे .
निवेदनात नमूद आहे की, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजूर तसेच मुंबई पुणे व राज्यातील इतर भागातून गावी परतलेल्या शेकडो मजुरांच्या हाताला सध्या कोणतेही काम नसल्यामुळे आगामी काळात त्यांची मोठी आर्थिक अडचण होणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल अशी भीती व्यक्त होत आहे सदर मजुरांना त्यांच्या गावाजवळ काम उपलब्ध करुन देण्याची नितांत आवश्यकता आहे ,याकरीता मनरेगा आणि केंद्र तथा राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत रस्ते बांधकाम, जलसंधारण, आदी कामे सुरू करून प्रत्येक मजुरांना काम उपलब्ध करुन देण्याच्या उपाय योजना तातडीने करण्यात यावा अशी मागणी मंगेश सुभाष पाटील ,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष जळगाव , अध्यक्ष सुरत्न प्रतिष्ठान भुसावळ यांनी केली असून खासदार रक्षाताई खडसे ,आमदार संजय सावकारे , आमदार स्मिताताई वाघ, यांना सुद्धा निवेदनाच्या प्रत रवाना केल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *