जळगाव ( प्रतिनिधी ) – दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा, उत्सवाचा किवा फराळाचा सोहळा नाही, तर ती आपल्या संस्कृतीतील एक गूढ, पवित्र आणि संवेदनशील जाणीव आहे. हीच दिवाळी
जेव्हा पहाटेच्या नीरव शांततेत संगीताच्या
सुरांनी सजते, तेव्हा ती एक सांस्कृतिक
अनुभूती देणारी पर्वणीच ठरते..! पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारा परिवार म्हणणे सुबोनियो परिवार आहे..जळगावमध्ये सुबोनियो परिवार आयोजित आणि खान्देशातील प्रसिद्ध कलावंत व निवेदक तुषार वाघुळदे प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा 7 स्ट्रिंग्स प्रस्तुत सप्तसुरांची संगीत व प्रकाशमय ….. “दिवाळी पहाट” हे यंदाचं असंच एक अनुभव संपन्न पर्व ठरलं..दिवाळी निमित्ताने विविध सांस्कृतिक पैलूंची उधळण करणारा “दिवाळी पहाट” कार्यक्रम सादर झाला.

या कार्यक्रमाला जळगावच्या रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.दिवाळी पहाट हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही तर संस्कृती आणि अध्यात्माचा उत्सव… खरंच वर्षभराच्या गोंधळातून ,धकाधकीच्या जीवनातून निवांत ,सुरेल पहाट अनुभवण्याचा हा क्षण जळगावकर संगीत-कला प्रेमींच्या मनात एक नवी अनुभूती व उत्साह निर्माण करणारा ठरला..! या मैफिलीचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे ,उद्योगपती राजेश चौधरी,मनसे नेते जमील देशपांडे, सुबोध चौधरी ,जितेंद्र खडके यांच्या हस्ते झाले.
सकाळचे रम्य आणि आल्हाददायक वातावरण” रसिक-प्रेक्षकांना एक वेगळी मेजवानी देऊन गेली..दरम्यान कालिंका माता चौक परिसरात नागरिक,प्रेक्षक आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती..मधुर सुरांनी सजलेली ,भक्तीच्या सुवासाने दरवळलेली आणि आधुनिकतेच्या झंकाराने सकाळ उजळली. खान्देशातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका ऐश्वर्या परदेशी , गायक मयूरकुमार तसेच गायिका . भानुप्रिया ठाकूर ,नवगायिका दीक्षा सपकाळे यांचे भक्तिरसपूर्ण प्रस्तुती रसिक-प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली..
शास्रीय, भक्तिसंगीत,भावगीत आणि आधुनिक संगीताचा संगम रसिकांसाठी पर्वणी
ठरणारा असाच होता.. संकल्पना व संगीत संयोजन सुप्रसिद्ध निवेदक तुषार वाघुळदे यांचे होते. या कार्यक्रमाचे आकर्षण होते ते म्हणजे ज्युनियर नाना पाटेकर ( राजू पाटील ) यांनी वासुदेव ,साईबाबा आणि नाना पाटेकर यांची भूमिका कसदारपणे वठवून प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली व धमाल केली..

शहरातील श्री कालिंका माता चौक ,एच.डी. एफ.सी. बँक प्रांगण येथे ” दिवाळी पहाट ” ही सुश्राव्य संगीताची मैफिल रंगली. या मैफिलीची चर्चा शहरासह जिल्ह्यातही झाली.
या कार्यक्रमाचे आयोजन सुबोनियो परिवाराचे सुबोधकुमार सुधाकर चौधरी, सुनिलकुमार सुधाकर चौधरी,
, सुयोगकुमार सुधाकर चौधरी, सौ.हिरा सुबोधकुमार चौधरी
सौ.सारिका सुनिलकुमार चौधरी
सौ.अपर्णा सुयोगकुमार चौधरी
सुमोल सुबोधकुमार चौधरी,
सौ.सृष्टी सुमोल चौधरी यांनी केले होते.या “स्वर सोहळ्या”त विविध प्रकारची गाणी, भूपाळी, माऊलींची इराणी, भावगीते,भक्तिगीते, भजने,निसर्ग गीत,गझल आणि लावणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केली. या कार्यक्रमातील गाण्यांना वाद्यवृंदाची तितकीच तोलामोलाची साथ मिळाली. साथ संगत राजू जाधव ,शैलेश पगारे, प्रवीण महाजन,जयंत महाजन, दीक्षा सपकाळे आदींनी दिली. त्यामुळे कार्यक्रम एका टिपेला पोहचतो. आपले मराठी भावविश्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न संगीत संयोजक,निवेदक तुषार वाघुळदे यांनी यशस्वीरित्या केला आहे.या कार्यक्रमात ..’आली माझ्या घरी ही दिवाळी’ ,सूर निरागस हो..
माझे माहेर पंढरी,
केव्हातरी पहाटे..रामा 4रघु नंदना..,
सुंदर ते ध्यान..,
सलोना सा सजन है..,
आज जाने कि ज़िद ना करो. ,
घेई छंद मकरंद..,
मन मंदिरा.. सांसो कि माला पे..,विठ्ठल नामाचा टाहो,
निघालो घेऊन दत्ताची.., पालखी
बाजाराला विकण्या निघाली ( गवळण),
विठू माऊली तू, माऊली जगाची, वासुदेवाची स्वारी,
हे भोळ्या शंकरा..
गोपाळ कृष्ण करू आरती तेरी…
ऐरणीच्या देवा,
रामा राखूनंदना..
ऐरणीच्या देवा..
गोमू संगतीन..
काया मातीत मातीत,
जेजुरीला जाऊ..,
रेशमाच्या रेघांनी…,
मेंदीच्या पानांवर…ही अवीट गाणी सादर झाली.. ही सांगीतिक मैफिल रसिक-प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय सुरेल अशीच ठरली आहे.या संगीत मैफिलीचे अत्यंत बहारदार आणि विशेष व दमदार निवेदन प्रसिध्द निवेदक तुषार वाघुळदे यांनी तर आभार सुमोलकुमार चौधरी यांनी मानले.



