जळगाव जिल्ह्यात पाऊस ; पुढील ४ दिवस राज्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा ;


जळगाव ( प्रतिनिधी ) हिंदी महासागर, बंगालच्या उपसागरात पाण्याचे तापमान वाढले असल्याने याआहे. परिणामी राज्यात आगामी ४ दिवस विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. यामध्ये आगामी तीन दिवस जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यातील हवामानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. राज्यभरात जळगाव जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. इतकेच नव्हे तर शुक्रवारी रात्री जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. आता आज पुन्हा २५ ऑक्टोबर पासून २८ ऑक्टोबर पर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याच दरम्यान अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज?
आजपासून ते २७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान जिल्ह्यात पुढील तीन दिवस ढगाळ हवामान, कमाल तापमान राहणार असून दुपारी उकाडा जाणवणार आहे

या जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा
२५ ऑक्टोबर – नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, वर्धा, नागपूर.
२६ ऑक्टोबर – मुंबई, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड.
२७ ऑक्टोबर –धुळे, मुंबई, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर.
२८ ऑक्टोबर – पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड.