भुसावळातील सिंधी कॉलनी , शांति नगर , समतानगर, पंचशीलनगरसह परिसर सील ;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने पोलिसांनी परिसर सील करण्याचे काम हाती घेतले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीला परिसर सील करण्यास स्थानिकांनी केले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत व पोलीस कर्मचारी यांनी पंचशील नगर भागात सकाळी ९.३० ते १०.३० वाजेपर्यत नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट पाहिली. मात्र, एकही कर्मचारी घटनास्थळी एकही कर्मचारी न पोहचल्याने स्वतः गंगाराम प्लॉट, पंचशील नगरमधील नाल्याची हद्द,अनिल हॉटेल,शनी मंदिर भागातील साईबाबा मेडिकल,पापा नगर जवळील नाल्याच्या पुला पर्यतची हद्द हातगाडया रस्त्यात आडव्या लावून व बांबू बांधून या भागातील परिसराला सील केले आहे.तसेच नाहाटाकॉलेज ते अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड येथे लावण्यात आलेल्या सीलमुळे नागरिकांना आवरणे कठीन झाले होते.
दरम्यान उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांनी राष्ट्रवादी पार्टीच्या नगरसेविका मीनाक्षी धांडे यांचे पती नितीन धांडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. व त्यांनी धांडे यांच्या भागातील ३० तरुणांची टीम देण्यास सांगितले. तसेच त्या तरुणांचे आयकार्ड पोलिक अधीक्षक यांच्याकडून बनवून देण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांनी स्वीकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *