जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी सोडत जाहीर झाली. आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रस्थापिताना मोठा धक्का बसला आहे. जळगावचे नवनियुक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील भवनात ही सोडत काढण्यात आलीय. जि.प.चे अध्यक्षपद 20 वर्षानंतर सर्वसाधारण प्रवर्गातून होणार आहे.

असे आहे आरक्षण
सर्वसाधारण 31, नागरीकांचा मागास प्रवर्ग 18, अनूसूचित जाती 13 आणि अनुसुचित जमाती 6 असे एकुण 68 गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. 50 टक्के आरक्षण (34 जागा) महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यात 68 जागांसाठी ही जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. यात 68 जागांमध्ये 34 महिला जिल्हा परिषद सदस्य असणार आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग
पातोंडा, घोडेगाव, म्हसावद, शहापूर, म्हसवे, दहिवद, कासोदा, मेहुणबारे, शिरसोदे, टाकळी प्र.चा. पिंपळगाव बुद्रुक, विखरण, नाडगाव, पाळधी, पातोंडा, नेरी दिगर, भालोद, लिहे.
सर्वसाधारण प्रवर्गाकरिता
उंबरखेड, लोहटार, नगरदेवळा बुद्रुक, बांबरुड प्र.बो., बहाळ, तामसवाडी, शिरसमणी, मांडळ, गिरड, तळई, कळमसरे, पाळधी खुर्द, न्हावी प्र. यावल, लासुर, पहुरपेठ, गुढे, साळवा, कुसंबे खुर्द, तोंडापूर, कजगाव, बेटावद बुद्रुक, जानवे, रांजणगाव, हरताळे, शिरसोली प्र.न., कुन्हे प्र.न., शेलवड, साखळी, लोहारा, ऐनपूर, सायगाव.
अनुसूचित जमाती
विरवाडे, धानोरा प्र.अ., अडावद, घोडगाव, चहार्डी, हिंगोणे, किनगाव बुद्रुक, केर्हाळे बुद्रुक, चिनावल, कुर्र्हे, कानळदा, आसोदा आणि पिंप्री खुर्द .
अनुसूचित जाती
वाघोड, निंभोरा बुद्रुक, वाघोदा बुद्रुक, अंतुर्ली, कंडारी आणि निंभोरा.


