भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील नगरपरिषदेतर्फे हद्दीतील ३७८ दिव्यांगांना नगरपरिषदेने ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप नगराध्यक्ष रमण भोळे,मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या हस्ते शुक्रवार २४ एप्रिल रोजी वाटप करण्यात आले.
यात १०० ते ८० टक्के,७९ ते ६० व ५९ ते ४० अशा तीन गटात विभागणी करून अनुक्रमे प्रत्येकी ५ हजार,४हजार व ३ हजार रु.निधी देण्यात आला.सदर निधी प्रत्येकाच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.
यावेळी लेखापाल संजय बनाईते,सामाजिक कार्यकर्ते बापु महाजन,अंतर्गत लेखा परिक्षक भामरे मॅडम,सहाय्यक अंतर्गत लेखा परिक्षक विजय गाडेकर,शांताराम सुरवाडे आदी उपस्थित होते.यावेळी दिव्यांग जनकल्याण गृप भुसावळचे शेख अकबर अहमद, इजरीज बागवान,सुनंदा कलाल, अब्दुल नबी पटेल,नाहार,राजू श्याम उपस्थित होते.८० दिव्यांग लाभार्थ्यांना जे.डी.सी.सी. बँकेची अडचणी असल्याने निधी बँकेची अडचण दूर झाल्यानंतर देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.



