भुसावळ रेल्वे रुग्णालयातील डॉक्टर्स यांना २०० पी.पी.ई किट्स ; सीएन्डडब्लू विभागातर्फे तर्फे एक हात मदतीचा ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या सीएन्डडब्लू भुसावळ
विभागाकडून  200 पी.पी.ई किट खरेदी करण्यात आले असून हे किट रेल्वे हॉस्पीटल मधील डॉक्टरांच्या उपयोगाकरीता करीता मुख्य चिकीत्साअधिकारी यांचेकडे सुपुर्द करण्यात आले आहे .
कोरोना च्या दुष्प्रभाव  रोखण्यासाठी डॉक्टर्स अहोरात्र रुग्णाच्या सेवेत व्यस्त आहे .भुसावळ येथील रेल्वे हॉस्पीटल मधील डॉक्टर्स यांना सुद्धा रुग्णावर उपचार करतांना  संरक्षण मिळावे यासाठी येथील  मध्य रेल्वे भुसावळ विभागातील सी एन्ड डब्लू  विभागाने २०० पी.पी.ई.( पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट ) किटसची खरेदी करण्यात आली आहे . या किट्स भुसावळ रेल्वे हॉस्पीटलमध्ये मुख्य चिकीत्सा अधिकारी यांना देण्यात आली आहे. डॉक्टराना संरक्षण च्या दृष्टीने यां किट्सचा उपयोग होइल .
भुसावळ रेल्वे प्रबंधक  विवेक कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शन नुसार वरिष्ठ मंडळ पर्यावरण आणि गृह व्यवस्था प्रबंधक पी रामचंद्रन यांनी हे किट भुसावळ रेल्वे हॉस्पीटल मध्ये मुख्य चिकीत्सा अधिकारी एस सामंतराय यांच्याकड़े  स्वाधीन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *