जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेला पाखर लघुचित्रपटाची लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क, सेशन २०२० इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड ; विदर्भातील अकोला जिल्ह्यातील कवी गणराज मधू यांचे या लघुपटासाठी गीतलेखन

मुंबई : –
पाखर लघुचित्रपटाची निवड लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क, सैशन २०२० या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये झालेली आहे. जागतिक स्तरावर दखल घेण्यात आलेल्या पाखर या लघुचित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन सुराज कुटे यांनी केले आहे. लॉस एंजलिस येथील पाना स्टुडिओ आणि रैलीय स्टुडिओ हॉलिवूड येथे या लघुचित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. मानवी नातेसंबंध, जगण्याचा सकारात्मक आशावाद व सामाजिक संवेदनशील कथा असलेला पाखर लघुचित्रपट अविका एंटरटेनमेंट या युट्यूब चैनल वर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची संकल्पना सचिन फदाले यांची असून निर्मिती नषाली फदाले यांनी केली आहे. मुलं आणि पालक यांच्यातील नातेसंबंधांची सामाजिक वास्तविकता दर्शविण्याचा प्रयत्न पाखर या लघुचित्रपटाद्वारे दिग्दर्शकाने केला आहे. मुलांची बदलती वृत्ती आणि कृती. बद्ध आई-वडील आपल्यावर ओहो असल्याची त्यांची भावना, या भावनेमुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे बदलत जाणारे जीवन, परिणामी, गंभीर दुख भोगण्याची आलेली वेळ, यामधूनच सरतेशेवटी अनपेक्षितपणे घडलेल्या घटनेद्वारे हा लघुचित्रपट विचार करायला प्रवृत्त करतो. पाखर या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन अतिशय उत्तम झाले आहे. तसेच सर्वच कलाकारांनी भारदस्त अभिनय केला असुन गीत व संगीत अतिशय श्रवणीय असल्याच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहेत. सर्वत्र कौतुक होत असलेल्या पाखर लघुचित्रपटासाठी गणराज मधू यांनी काळजाचा ठाव घेणारे अतिशय सुमधुर गीत लिहिलं असून देवांग अहिरराव यांनी ते संगीतबद्ध करुन गायलेलं आहे.पार्शसंगीत आणि संयोजक बिनोद बनसोडे पांच आहे. छायाचित्रकार व संकलन अभिषेक पांचाळ यांनी केलं असुन छायाचित्रण संचालक प्रजेश फुलसुंदे हे आहेत. हरिशंद्र भंडारे, उर्मिला डांगे, सचिन फदाले, सुभाष मुंडे, अंजली यादव, स्वमाली कांबळे केळजी, साक्षी गायकवाड, सिताराम फदाले, रविंद्र जैद, अश्वानी मलिक, संतोष काळे यांनी या लघुचित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत.पाखर या लघुपटाच्या माध्यमातून दिल्या जाणान्या संदेशातून कमीत कमी एका कुटुंबाचे डोळे उघडून,एका घरामध्ये जरी बदल घडल्यास हा लघुपट खन्या अर्थाने सार्थक होईल,असं मत पाखर या लघुचित्रपटाचे दिग्दर्शक सुराज कुटे यांच आहे. जागतिक स्तरावर नावाजत असलेला हृदयस्पर्शी, वास्तवदर्शी कथानक असलेला हा आशयघन लघुचित्रपट पावर,अविका इंटरटेनमेंट पूल्यूब चैनल वर जाऊन सहकुटुंब बघावा.असे आवाहन निमति व दिग्दर्शक तसेच कलाकारांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *