नवी मुंबई :-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिप्रेत असणारे अभिवादन करण्यात आले. नवी मुंबई कोपरखैरणे येथे असंख्य हातमजूरी करून आपल्या उदरनिर्वाह करिता बाहेरील जिल्ह्यातून कामाकरिता येथे आलेले आहेत.त्यात काही निराधार महिला सुद्धा आहे. परंतु कोरोना आजाराच्या महामारीमुळे त्यांच्यावर अत्यन्त संकटमय परिस्थिती येऊन पडली असता सध्या संचारबंदी मुळे त्यांना आपल्या गावी जाणे शक्य नाही.अशा परिस्थितीची दाखल घेऊन भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर व महाराष्ट् अध्यक्ष यु.जी.बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई जिल्हाध्यक्ष जयवंत लव्हांडे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या १२९ व्या जयंती पासून दररोज कोपरखैरणे येथे १० कूटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. आता पर्यंत ६० कुटूंबांना त्यांनी मदत केली आहे. गहू , तांदूळ , डाळ , मीठ , पिठ असे ९ ते १० किलो बसेल असे पाकीट प्रत्येक कुटूंबांना ते वाटप करत आहेत.भा.बौ.म महिला सचिव सुप्रियाताई खोडके, धम्मशील बुध्द विहार सेक्रेटरी नरेंद्र कांबळे, बौध्दाचार्य दिगंबर सुर्यवंशी, उपासिका अनिताताई सुर्यवंशी, मंगलताई कांबळे, तात्याराव कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.अजून ही . डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंती साजरी करण्याच्या उदान्त हेतूने भुकेल्याला अन्न व जीवनावश्यक वस्तू वाटप करून संचारबंदी उठेपर्यंत ऐकून 10 कुटुंबाचा खर्च भारतीय बौद्ध महासभा ह्यांनी उचलला असून ह्या सर्व कुटूंबाना लॉक डाउन संपेपर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी ह्यावेळी त्यांना गहू,तांदूळ, साखर, तेल इत्यादी सह जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार असल्याचे भारतीय बौध्द महासभेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष जयवंत लव्हांडे यांनी सांगितले.



