भुसावळात सीनियर फोटोग्राफर तर्फे आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन उत्साहात साजरा.


भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सीनियर फोटोग्राफर तर्फे आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन (छायाचित्र दिन) उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील शिव कॉलनीमध्ये भुसावळातील सीनियर फोटोग्राफरतर्फे १९ ऑगस्ट हा दिन आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी रेल्वे स्कूलचे सेवानिवृत्त कलाशिक्षक राजेंद्र जावळे,अविनाश साळी,गोकुळ महाजनलोकमत वृत्तपत्राचे पत्रकार छायाचित्रकार श्याम गोविंदा,गणेश राठोड,मुकेश नेवे,कल्पना जावळे,ज्योती महाजन,आभा साळी,दिपाली पाटील,स्मिता राठोड,प्रीती नेवे,नीरज पाटील,आदित्य पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.सुरुवातीला महिलांनी दीप प्रज्वलन करून कॅमेरा पूजन केले.त्यानंतर सर्व सिनियर फोटोग्राफरांनी सामूहिक कॅमेरा पूजन केले.व जागतिक छायाचित्र दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश साळी तर आभार प्रदर्शन आपल्या कवितेतून राजेंद्र जावळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सीनियर फोटोग्राफरने परीक्षण घेतले.

फोटो कॅप्शन – भुसावळात आंतरराष्ट्रीय छायाचित्र दिनानिमित्त कॅमेरा पूजन करताना राजेंद्र जावळे सोबत डावीकडून अविनाश साळी,गणेश राठोड,स्मिता राठोड,श्याम गोविंदा,गोकुळ महाजन,मुकेश नेवे,प्रीती नेवे मागे उभे आभा साळी,कल्पना जावळे,दिपाली पाटील,ज्योती महाजन छायाचित्रात दिसत आहे.