दीपनगरात 660 मेगावॅट प्रकल्पाच्या कामास जिल्हाधिकार्‍यांची परवानगी –

भुसावळ (प्रतिनिधी )-
दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील साडेचार हजार कोटींच्या 660 मेगावॅट प्रकल्पाचे काम लॉकडाऊनमुळे ठप्प झाले होते मात्र प्रकल्पाचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे काम सुरू करण्याबाबत परवानगी मागितल्याने नियमांना अधीन राहून कामाला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायझेनसह सुमारे 50 कामगारांची आरोग्य तपासणी करून मंगळवारपासून कामाला सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या कामाचा कालखंड वाढू नये, वेळेत प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी महानिर्मितीने व्यापक नियोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *