भुसावळात गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील दावत-ए-इस्लामी हिंदच्या सामाजिक सेवा विभागांतर्गत गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे 1500 वा ईद मिलादुन्नबी व स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सुन्नी जामा मशीद, जाम मोहल्लासमोर दुपारी दोन ते सायंकाळी सहा दरम्यान होईल.

या शिबिराचा उद्देश समाजात रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे आणि गरजू रुग्णांना वेळेवर सुरक्षित रक्त उपलब्ध करून देणे आहे. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व आरोग्य तपासणी अहवाल दिला जाणार आहे. रक्तदान शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनने केले आहे.