भारत विकास परिषदेतर्फे मदत निधी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भारत विकास परिषदेच्या भुसावळ शाखेतर्फे पंतप्रधान मदत निधीत २१ हजार रुपयांचा धनादेश तहसिलदार दिपक धिवरे यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आला. सोशल डिस्टन्सींगचे भान बाळगत मोजक्याच सदस्यांना सोबत घेऊन हा धनादेश देण्यात आला.
यावेळी शाखा अध्यक्षा डॉ. निलीमा नेहते, उपाध्यक्ष विलास फालक,सचिव उज्वल सराफ, कोषाध्यक्ष सुनिल इंगळे, संघटन सचिव भूषण वाणी,प्रकल्प प्रमुख श्याम दरगड,डॉ.संजय नेहते,गोटू लाहोटी,राष्‍ट्रीय स्‍वंयसेवक संघाचे सोनु मांडे आदी उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *