भुसावळ ( प्रतिनिधी ) –
येत्या २५ एप्रिल पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान सुरुं होत असून मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र महीना आहे. मात्र संपूर्ण भारतामध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता गर्दी होऊ नये याकरीता लाॕकडाऊन व संचारबंदि सुरु आहे , या साठी
आपल्या आंनद व उत्साहावर यंदा सर्वानी आवर घालून अतिशय शांततेने व संयम राखून रमजान सण साजरा करायचा आहे, यासाठी रमजान महिन्यात असलेल्या उपवासासाठी लागणारी अत्यावश्यक साधनसामग्री आपल्या परिसरातील नजिकच्या दुकानांमधून खरेदि करावे. मशिदीमध्ये चारच व्यक्तीनी उपस्थित राहवे, कोणीही विनाकारण गर्दी करु नये , नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येइल , सर्वानी प्रशासनास असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांनी पोलिस प्रशासनातर्फे केले असून कोविड १९ बचावासाठी विशेष सूचना देवून मार्गदर्शन केले.
येथील मुस्लीम काॕलनी मधिल हिरा मॕरेज हाॕल मध्ये २५ तारखेपासुन सुरु होणाऱ्या रमजानच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटिची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी राठोड बोलत होते .
रमजानची नमाज घरातच पठण करावी – मौलाना नुर मौहम्मद यांचे आवाहन
रमजान निमित्त होणारे नमाज पठण हे घरातच करावे कोणीही मज्जीद अथवा प्रार्थनास्थळावर जावू नये , गर्दी करु नये, नमाज मशिदी मध्ये पठण करण्यासाठी जाणे बंधनकारक नसुन नमाज सर्वानी आपआपल्या घरातच अदा करावी व प्रशासनाच्या नियम व अटींचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी मौलना नुर मोहमद यांनी समस्त मुस्लिम बांधवांना केले .
या तीन ठिकाणी भरणार रमजानचा बाजार ;
रमजान महिन्यात लागणाऱ्या साहित्याचा भरला जाणरा बाजार हा रजा टाॕवर जवळील तीन नंबर शाळा, हाजी मुन्ना तेली यांच्या घराजवळील शाळेच्या आवारात, तसेच मुस्लीम काॕलनी भागातील मैदान या तीन ठिकाणी बाजार भरवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले .
यावेळी बैठकीस पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षीक दिलीप भागवत, शहर पोलिस स्टेशन निरीक्षक बाबासाहेब ठोंबे , खडका येथील पोलिस पाटिल सुरतसींग पाटिल, अध्यक्ष मुन्ना तेली,अशीक खान,मौलाना नुर मौहम्मद,नुर आलाम,नगरसेवक सलिम पिंजारी, माजी नगरसेवक शे.पापा शे.कालु , सामजिक कार्यकर्ते सिंकदर खान, शरीफ ठेकेदार खडका ग्रा. प. सदस्य शब्बीर बागवान,रईस लोधी यांच्या सह काही समाज बांधव उपस्थीत होते.



