नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यानी घेतला रानभाजी महोत्सवाचा आनंद ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –
भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात 11 ऑगस्ट रोजी रानभाज्या व पाककला प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी.एच बऱ्हाटे सर यांच्या हस्ते करण्यातआले

.रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भरपूर प्रमाणात उपलब्धअसतात,रानभाज्या खनिजे,जीवनसत्वसंपन्न असतात.त्यांचा आहारात समावेश करावा असे आवाहन केले. ऊप प्राचार्य डॉ.डी.एन पाटील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विद्या पाटील तसेच, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख. मनोजकुमार जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून विविध रानभाज्यांची ओळख करून देण्यात आली.स्पर्धेसाठी फक्त विद्यार्थिनीच नव्हे तर विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले. .
प्रा. डॉ. विद्या पाटील यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कु. फ्रकलीन यांनी केले. एकूण 25 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला.कटूरले, अंबाडी,अळू,तांदूळ जीरा,अंबूशी, चीवई, अशा रानभाजाचे पाककला विद्यार्थ्यानी सादर केल्या व त्याचा आस्वाद घेतला.स्पर्धेचे नियोजन व आयोजन साठी समिती सदस्य प्रा. सपना नारखेडे, प्रा.श्रुती रूले प्रा. ज्योती जंगले,प्रा.शेख प्रा.वंदना राठोड, प्रा.वर्षा अठे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.