भुसावळ (प्रतिनिधी )-
देशभरात कोरोना कोवीड १९ आजाराने थैमान घातले असून जिल्हाधिकारी डाॅ.अविनाश ढाकणे यांनी कुणीही नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचे आदेश दिले आहे. शहरातील संत सेना महाराज व्यापारी संकुलातील श्रीकृष्ण किराणा दुकानात सोशल डिस्टंटींगचे उल्लंघन करुन अनेक ग्राहक एका ठिकाणी गर्दी करुन नियमांचे भंग करून उभे असताना आज दि.२१ एप्रिल रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या नेतृत्वाखाली लेखापाल संजय बनाईते,नगर अभियंता पंकज पन्हाळे,प्रशासकिय अधिकारी परवेज शेख,अधिकारी राजीव वाघ,सुरज नारखेडे,विशाल पाटील,महेश चौधरी,सचिन नारखेडे,सतिश बेदरकर,धनराज बाविस्कर,राजीव पाटील व श्री.लोहार यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई करीत दुकान मालक सुरेश तलरेजा यांना पकडून १० हजाराचा दंड ठोठावला.या कारवाई मुळे एकच खळबळ उडाली आहे



