भडगाव – शासकीय आयटीआय येथून चोरी झालेला ५ लाख रुपये ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या ६ तासांच्या आत भडगाव पोलिसांना यश आले असून आरोपीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे

भडगाव पोलीस स्टेशन येथे १७/०७/२०२५ ते ०५/०८/२०२५ दरम्यान ५ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर शासकीय आयटीआय येथून चोरी झाल्याची तक्रार सुधीर किटकुल सोनवणे यांनी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. गोपनीय माहितीच्या आधारे तपासात संशयीत आरोपी सुनील कैलास पाटील, रा. गिरड, ता. भडगाव याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. चोरी केलेला ५ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे
ही कामगिरी पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, ,अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर, चाळीसगाव परिक्षेत्र, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड,चाळीसगाव भाग यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोउपनिरी.सुशील सोनवणे, पोना मनोहर पाटील, पोकाँ प्रवीण परदेशी, निलेश बर्मनकर चालक पोकाँ संजय पाटील यांनी केली आहे.पुढील तपास पोना भूषण पाटील हे करत आहेत.


