भुसावळ (प्रतिनिधी ) – विविध मागण्यांसाठी रेल कामगार सेना भुसावळ विभागातर्फे जागतिक ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त येथील डीआरएम कार्यालयासमोर ८ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख, रेल कामगार सेनेचे आधारस्तंभ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने , रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष,शिवसेनेचे खासदार विनायकराव राऊत, सरचिटणीस दिवाकरजी देव, कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या आदेशानुसार कामगारांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आहेत मागण्या
डी आर एम मुख्य प्रवेशद्वारा जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणे,रेल्वे दवाखान्यात रिझर्वेशन खिडकी चालू करणे,रेल्वे दवाखान्यात जे डॉक्टर ड्युटीवर आहेत त्यांचा लिखीत बोर्ड लावणे,जुनी पेन्शन स्कीम त्वरित चालू करणे,एम ए सी पी मध्ये जो घोळ चालू आहे तो घोळ दूर करून कामगारांना विना विलंब एम ए सी पी लागू करणे, रेल्वेच्या सर्व विभागात आरो युक्त पाण्याचा पुरवठा करणे,संवेदनशील पदावर जे कर्मचारी अनेक वर्षापासून नोकरी करत आहेत त्यांची बदली करणे,जे कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यांना योग्य मानसन्मान देऊन सेवानिवृत्त करणे,लार्जेस स्कीम पुन्हा चालू करणे,जे कर्मचारी अप डाऊन करण्यासाठी पात्र आहेत त्यांना अप डाऊन साठी FRC पास देणे,रेल्वे दवाखान्यात नियमित ज्या औषधांचे वाटप होते त्या औषधान वरती सकाळ दुपार संध्याकाळ असे लेबल लावण्यात यावे. .
यावेळेस ललितकुमार मुथा,प्रीतम टाक,विनोद वाघे,योगेश माळी,अरविंद थोरात,मुकेश महाजन,संतोष देशमुख,मनोज गावंडे,कमलाकर बानाईत, पंकज ठाकरे, निरंजन राऊत,भरत शर्मा,अभिषेक गाडल्लू, संजय चौधरी,मोहन राजपूत, लालसिंग चव्हाण, मोहन यादव,रमेश मराठे, कमलेश परदेशी, चंदन न्हावी, योगेश पडळकर,शांताराम सपकाळे,मंगू शेलोडे, महेंद्र भोळे,देवेंद्र गुरव गोपाल,सुरेश लक्ष्मण दरेकर, चंद्रकांत सरोदे,राजेश भालेराव दीपक जोहरे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते


