रक्षाबंधन सणाला सेंट अलॉयसेस हायस्कूलने सुटी द्यावी – शिवसेनेची मागणी ; प्राचार्याना दिले पत्र ;


भुसावळ (प्रतिनिधी ) -रक्षाबंधन सणाला सेंट अलॉयसेस हायस्कूलने शाळेला सुटी द्यावी , अशी मागणी येथील शिवसेना शिंदे सेनेने केली असून याबाबत सेंट अलायन्सेस हायस्कुल प्राचार्याना निवेदन देण्यात आले आहे तसेच शाळेला 9 ऑगस्ट ला सुटी न दिल्यास शाळेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .

येथील सेंट अलॉयसेस हायस्कूल या शाळेत हिंदू संस्कृतील अत्यंत्य पवित्र मानल्या जाणाऱ्या ह्या रक्षाबंधन सणाला गेल्या अनेक वर्षांपासून शाळा सुटी देत नाही यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने शाळेत यावे लागते ते रक्षाबंधन पवित्र सणाचा आनंद घेऊ शकत नाही ,
दिनांक 9 ऑगस्ट रोजी भाऊ बहिणीच्या अत्यंत्य जिव्हाळा चा सन रक्षाबंधन असताना सुद्धा आपली शाळा गेल्या अनेक वर्षांपासून सुटी देत नाही , वास्तविक पाहता महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट आदेश आहेत की गणेशोत्सव किंवा नाताळ सणाला सुट्ट्या घ्यायच्या असतील तर दिवाळीच्या शेवटच्या काही सुट्ट्या कपात करून त्या घेण्यात याव्यात ,मात्र ही शाळा मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन व पोळा यासारख्या सुट्या कपात करून त्या सुट्ट्या नाताळ सणाला घेतात विशेष म्हणजे या शाळे मध्ये शिक्षण घेणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांची संख्या जास्त असताना सुद्धा हिंदूंच्या सणाला सुट्टी दिली जात नाही,त्या मुळे पालकामध्ये प्रचंड असंतोष आहे
पोळा हया सणापर्यंत रक्षाबंधन हा सण साजरा करतात त्या मुळे विद्यार्थी ती राखी पोळा हया सण पर्यंत हातावर बांधतात परंतु या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या हातात राखी दिसल्यास ती कापायला लावतात किंवा ती काढून टाकतात यासाठी हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य करू नये , तरी
तात्काळ 9 ऑगस्ट रक्षाबंधन ह्या दिवशी शाळेने सुट्टी जाहीर करावी अन्यथा शिवसेना (शिंदे सेना ) च्यावतीने शाळेसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे यावेळी मा नगरसेवक शिवसेना दिपक धांडे , वैद्यकीय तालुका प्रमुख योगेश वाघ , पिंटू भोई विभाग प्रमुख व रोहित वराडे. आदी उपस्थित होते .

दरम्यान या निवेदनाची प्रत माहितीस्तव महाराष्ट्र मुख्यमंत्री, उप शिक्षणाधिकारी जळगाव , गट शिक्षणाधिकारी भुसावळ यांना रवाना केली आहे