सक्षम नारी फाऊंडेशन तर्फे जिवनावश्‍यक वस्‍तु वाटप.

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देशात लॉकडाऊन सुरु आहे यामुळे हातमजूर व गोरगरीब यांचे हाताला काम नाही म्हणून अश्या गरजुंची मदत करण्याकरीता
येथील सक्षम नारी फाऊंडेशन तर्फे ज्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे अशा ६० कुटुंबांना प्रत्येकी ५ किलो गहू,२ किलो तांदूळ,२ किलो डाळ,२ किलो साखर,चहा पावडर,१ लिटर तेल, मिरची पावडर, अंघोळीचा व कपडे धुण्‍याचा साबण यांचे वाटप करण्यात आले.
फाऊंडेशनच्या डॉ सुवर्णा गाडेकर,डॉ.रंजना शिंगणे,डॉ वैशाली रामवंशी, पल्लवी अंबाडे,सुनीता जोशी, सुनंदा डांगे यांनी या उपक्रमासाठी स्वखर्चाने मदत केली.
भुसावळ येथील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ.स्वाती चौधरी व डॉ.छाया चौधरी ह्यांनी सुद्धा यामदत कार्यास फाउंडेशन वर विश्वास ठेवून प्रत्येकी अनुक्रमे १० व २ कुटुंबांना मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *