भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील श्री शिवाजी छात्रालय संचालित राजर्षी श्री गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय येथे बुधवार दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी. सुरक्षा व भौतिक विकसन समिती सभा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष दिनानाथ ओगले उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून बाजारपेठ पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील , महिला पोलीस उपनिरीक्षक भारती काळे , महिला दक्षता समिती सदस्या तथा समुपदेशक आरती चौधरी , डॉ.जान्हवी पाटील , मुख्याध्यापक किरण पाटील सर आदी उपस्थित होते..

यावेळी समुपदेशक आरती चौधरी यांनी पालक आणि विद्यार्थांना मार्गदर्शन केले तर मुलींना शारीरिक शिक्षण या विषयाबद्दल डॉ.जान्हवी पाटील यांनी सविस्तर माहिती दिली तर पोलिस अधीक्षक नितीन पाटील व पोउनि भारती काळे यांनी सायबर क्राईम आणि मोबाईल मुळे होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद पाटील सरांनी केले तसेच आभार प्रदर्शन .राहुल लोणाग्रे सर यांनी केले.


