जळगाव, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील १२ वर्षीय अल्पवयीन तरुणीला जबरदस्ती तोंड दाबून पळवून नेत एका नराधम तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रात्री लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या अल्पवयीन तरुणीला जबरदस्ती तरुणाने बंद घरात नेऊन अत्याचार केला.

चोपडा तालुक्यातील सातपुड्यात असलेल्या जिरायतपाडा येथे वास्तव्यास असलेले पीडित कुटुंबातील सर्वजण झोपी गेले. याच दरम्यान रात्री ११ वाजेच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी
घराबाहेर आली असता
अंधारात दबा धरून बसलेल्या नराधम तरुण स्नेहल दिलीप पावरा याने मुलीचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन एका बंद घरात तिच्यावर अत्याचार केला.
दरम्यान लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात गेलेली मुलगी परत घरात आलीच नाही म्हणून मुलीच्या वडिलांनी रात्रभर जिरायतपाडा गावात शोधाशोध केली परंतु ती कुठेच आढळून आली नाही.
आई,वडिलांसह सर्वच कुटुंब चिंतेत असतांना अंधारात अल्पवयीन मुलगी पहाटे चार वाजेच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत रडत घरी परतली. यावेळी वडिलांनी अल्पवयीन मुलीला विचारले असता तिने सांगितले की,लघुशंकेसाठी घराच्या बाहेर अंगणात गेली असता माझेवर पाळत ठेवणाऱ्या गावातील तरुणाने दोन्ही हातांनी माझे तोंड व हात बांधून जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन बंद असलेल्या घरात तब्बल पाच तास डांबून ठेवत अत्याचार केला. त्यानंतर संशयित तरुणाने घरापर्यंत सोडले असे मुलीने सांगितले .
या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादी वरून स्नेहल दिलीप पावरा याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शेषराव नितनवरे करीत आहेत.


