भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील के .नारखेडे विद्यालयात मुख्याध्यापक. वाय. एन. झोपे सर व उपमुख्याध्यापिका श्रीमती संगीता अडकमोल मॅडम यांच्या मार्गदर्शनातून शाडू माती पासून पर्यावरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. सावदा येथील मूर्तिकार .ललित भोरटके यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपती कसे बनवावे हे शिकवले व योग्य असे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला संस्था सेक्रेटरी पी. व्ही. पाटील यांनी भेट देऊन शाडू मातीचा वापर केल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण व गणेश मूर्तीची होणारी विटंबना आपण टाळू शकतो हा संदेश कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने शाडू माती पासून सुंदर अशा गणेश मूर्ती तयार केल्या.

कार्यशाळेस पर्यवेक्षक .एस. एल .राणे सर व एस. पी .पाठक सर उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या घरी सुद्धा या बनवलेल्या शाडू मातीच्याच गणेश मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन केले .या उपक्रमास संस्थाध्यक्ष . मकरंद भाऊ नारखेडे यांनी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा कळवल्या
या कार्यशाळेला संगणक विभाग प्रमुख बी. ए. पाटील सर व संगणक शिक्षक यांनी सुद्धा उत्साहाने भेट देऊन आनंद व्यक्त केला. तसेच पालकांनी सुद्धा कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक . एम. व्ही. गरुडे .एस .पी .महाजन व्ही .टी .भंगाळे व शाळेतील इतर शिक्षक शिक्षकेतर वृंद व स्काऊट च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.



