भारतीय बौद्ध महासभा महिला विभागाची जिल्हा बैठक संपन्न ;

जळगाव: भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व महिला विभागाची जिल्हा बैठक जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शनिवार रोजी वाघ नगर येथील यशवंत भवन येथे पार पडली. बैठकीचे सूत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी केले.

बैठकीत महिला जिल्हा, तालुका व शहर कार्यकारणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जळगांव जिल्ह्यातील संघटनेच्या “यशवंत भवन” उर्वरीत राहिलेले काम पदाधिकाऱ्यांकडून निधी गोळा करून पूर्णत्वास नेणे, तसेच बुद्धगया व महाराष्ट्र पर्यटन काढण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच समता सैनिक दलाचे जिल्हास्तरीय एकदिवसीय शिबिर आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीला जिल्ह्यातीलजळगाव शहर अध्यक्ष ज्योती दाभाडे, केंद्रीय शिक्षिका ज्योती भालेराव, पर्यटन विभाग सचिव सुनीता वानखेडे, कोषाध्यक्ष वंदना वानखेडे, आशा केदारे,प्रज्ञ| जवरे, विमल साळुंखे, विद्या झाकणे, शोभा इंगळे, युजाबाई इंगळे प्रमिला इंगळे , शोभा पाटोडे, सुषमा इंगळे,सर्व तालुका व शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांनी केले.